⚡मालवण ता.१५-: दहावी आणि बारावी परीक्षा २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव सोहळा रविवार २ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत संपन्न होणार आहे.
मालवण तालुका गाबित समाज कार्यकारिणीची नियोजन बैठक गाबित समाज नागरी सहकारी पतसंस्थेत घेण्यात आली. यावेळी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याबाबत नियोजन करण्यात आले. मालवण तालुक्यातील गाबित समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी २५ जून पर्यंत गुणपत्रिकेच्या झेरॉक्सह आपली नावे द्यायची आहेत. नावनोंदणी साठी गाबीत समाज मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, पवनकुमार पराडकर (आचरा), आनंद खडपकर (तळाशील), गंगाराम आडकर (सर्जेकोट/कोळंब), मालवण शहर – भाई कासवकर आणि अनुष्का मालंडकर (धुरीवाडा), नरेश हुले, पूजा सरकारे, दादा वाघ, राधिका कुबल (मेढा-राजकोट), सेजल परब, अन्वेषा आचरेकर, भाऊ मोरजे, महेंद्र पराडकर (दांडी), मिथुन मालंडकर आणि संतोष ढोके (वायरी), सहदेव साळगावकर (तारकर्ली-देवबाग), दिक्षा ढोके (भरड) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
