मंदार नाईक यांची माहीती ; तहसीलदारांकडून लेखी आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.१२-: तळवणे, मळेवाड,कोंडुरा, धाकोरे ह्या भागात शासनाचा महसूल बुडवून सुरु असलेल्या बेकायदा चिरे खाणीवर कारवाई बाबत पाऊल उचलले असे लेखी आश्वास तहसिलदार अरुण उंडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिल्याने मनसेने पुकारलेले आंदोलन स्थगित केले अशी माहीती मनसेचे माजी विभागअध्यक्ष मंदार नाईक यांनी दिली.
तळवणे मळेवाड कोंढुरा धाकोरे या भागात मोठ्या प्रमाणात चिरे उत्खनन केले जात आहे चिरे खाणींची परवानगी घेताना एका जागेचा एटीएस रिपोर्ट दाखवून दुसऱ्या जागेत चिरे उत्खनन करतात सदर सातबारा वेगवेगळे असून एकाच परवानावर दोन तीन खाणीत उत्खनन सुरू आहे त्यामुळे बेकायदेशीर खाणींद्वारे मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल बुडविला जात असताना महसूल विभागाकडून मात्र त्यांना अभय देण्यात येतो महसूलचे लक्ष वेधूनही काहीच हालचाली होत नसल्याने मनसेच्या वतीने महसूल विरोधात तहसिल कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात इशारा देण्यात आला होता. तसे निवेदनही तहसिलदार यांना देण्यात आले होते. दरम्यान खडबडून जागे झालेल्या महसुल विभागाने याबाबत दखल घेत संबधित चिरे उत्खनानाबाबत दंडात्मक कारवाई हाती घेतली जाईल असे ठोस लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले अशी माहीती श्री नाईक यांनी दिली.
