मालवण सेवांगण आयोजित जिल्हे महाराष्ट्राचे स्पर्धेचे बक्षीस वितरण
ओरोस ता.१२-:
बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्यावतीने घेण्यात आलेल्या “जिल्हे महाराष्ट्राचे एक स्पर्धा…” या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेत नंदकुमार वडेर, शिवराज सावंत, रोहिणी मसुरकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
बॅ. नाथ पै सेंवागण, मालवण यांच्या वतीने आयोजित जिल्हे महाराष्ट्राचे या ऑनलाईन प्रश्नमंच स्पर्धेला उत्स्पुर्त प्रतिसाद लाभला. अँड. देवदत परुळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन स्पर्धेचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. विजेत्या स्पर्धकांना ऑनलाईन प्रशस्तीपत्रके वितरीत करण्यात आली .
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक गुरुनाथ ताम्हणकर, ऋतूजा केळकर, तेजल ताम्हणकर, सानिका वायंगणकर, पार्वती कोदे, आर्या इळकर, संजयकुमार रोगे, अनुष्का वस्त, वैष्णवी आचरेकर यांनी विभागून मिळविला. तर तृतीय क्रमांक मनिषा पाटील, विश्मिता कुबल, शुभेच्छा सावंत, सहदेव घाडीगावकर, शितल गावीत, पल्लवी साईल, विशाखा पालव, प्रकाश उनकुले, जानवी ढोलम, डॉ. सोमनाथ परब, संतोष राऊत यांना मिळाला.
चतुर्थ क्रमांक श्रीकांत महाजन, हर्षल सातार्डेकर, प्रिया कुबल, रमेश ठाकूर, जयप्रकाश पेडणेकर, जयश्री पेडणेकर, साक्षी वायंगणकर, प्रियंका धुत्रे, सदानंद तावडे, उत्तेजनार्थ क्रमांक मानसराज गवस, अर्चना धुत्रे, सुनिल मालवदे, ओवी आरोसकर, अचल आरोसकर, शालीनी गवार यांनी मिळविला.
