महीला व युवकांना रोजगाराच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत

अर्चना घारे परब : खासदार विनायक राऊत यांच्याजवळ मागणी..

सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीला मोठा वाव आहे यासाठी कोकणरेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला सावतवाडीत थांबा मिळावा यासाठी खासदार म्हणून आपण प्रयत्न करावेत तसेच महीला युवकांना रोजगाराच्या दृष्टीने पाऊले उचलावीत असे आवाहन राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महीला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी विनायक राऊत यांच्याजवळ केली.

दरम्यान कोकणची मुले मुली दहावी बारावीत राज्यात अव्वल असतात मात्र पुढे जाऊन त्यांना काय करावे हे मार्गदर्शन मिळत नाही यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून लवकरच करियर मार्गदर्शन मेळावा घेण्यात येईल.

कोकण कला आणि गुणवंतांचा वारसा लाभलेली भूमी आहे येथील दशावतार सातासमुद्रापार पोहचला आहे, येथे अनेक खेळाडू आहेत मात्र त्यांना आवश्यक पाठबळ नसल्याने ते चमकू शकत नाही अशा अनेक गोष्टी येथे आहेत त्यावर काम करण शक्य आहे आणि भविष्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते केले जाईल असेही सौ. घारे म्हणाल्या. माहविकास आघाडीतर्फे तिरोडा येथे गाव भेटी कार्यक्रम खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता यावेळी सौ अर्चना घारे परब बोलत होत्या.

You cannot copy content of this page