विनायक राऊत ; केसरकरांवर राणेंना पाणी उचलून देण्याची वेळ..
⚡सावंतवाडी ता.११-: दहशतवादाचे हत्यार पुढे करून ज्या नारायण राणे यांच्या विरोधात केसरकरांनी राजकारण केले त्याच राणेंना पाण्याचे ग्लास उचलून देण्याची पाळी आज केसरकरांवर आली अशी टिका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.मुख्यमंत्री यांनी दीपक केसरकर यांना वाळीत टाकले आहे, कालच्या सावंतवाडी येथील सभेत दोघांमध्ये झालेल्या संभाषणावरून हे दिसून आले.
मुळात केसरकर हे आपल्या सोबत शिंदे गटात राहणार नाही हे त्यांना कळून चुकले आहे अशी टिकाही श्री राऊत यांनी केली.
खासदार श्री राऊत हे सावंतवाडी दौऱ्यावर असताना आज येथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते त्यांच्यासोबत बाळा गावडे महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत, मायकल डिसोजा अपर्णा कोठावळे चंद्रकांत कासार आबा सावंत आदी उपस्थित होते.
