शेतक-यांनी नफ्यात वाढ होण्यासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी…

प्रा. प्रसाद ओगले;रामेश्वर सोसायटी व असलदे ग्रामपंचायतच्यावतीने शेतकरी मेळावा

⚡कणकवली ता.०९-: आंबा व काजु बागायतदारांनी किफायतशीर असलेली सेंद्रीय शेती करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रीय शेतीमुळे होणारा खर्च मर्यादित होवून शेतक-याच्या उत्पन्नात वाढ होते , त्यासाठी आवश्यक ते तंत्र आत्मसात केले पाहिजे. भात शेती मध्ये उत्पादित झालेला तांदुळ बाजारात उकडा तांदूळ करुन विकल्यास शेतक-यांनी चांगला नफा होईल . रासायनिक खतांचा मर्यादित वापर करुन पारंपारिक सेंद्रीय खतांचा वापर शेतक-यांनी करावा. विषमुक्त शेती करण्यासाठी शेतक-यांनी पुढाकार घेतल्यास आम्ही मार्गदर्शन करु शेतक-यांनी पारंपारिक बी –बियाण्यांची जोपासना केली पाहिजे. शेतक-यांनी नफ्यात वाढ होण्यासाठी सेंद्रीय शेतीची कास धरावी असे , आवाहन छ. शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा.प्रसाद ओगले यांनी केले.

असलदे ग्रामपंचांयत येथील रामेश्वर सभागृहात रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी व असलदे ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , चेअरमन भगवान लोके, उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , खरेदी विक्री संघ संचालक पंढरी वायंगणकर , माजी चेअरमन प्रकाश परब , तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, पोलीस पाटील सावित्री पाताडे , कृषी तज्ञ प्राध्यापक प्रसाद ओगले , आत्मा व्यवस्थापक विनायक पाटील , माजी सरपंच लक्ष्मण लोके , माजी व्हाईस चेअरमन प्रदिप हरमलकर , ग्रामपंचायत सदस्य आनंद तांबे , विद्या आचरेकर , विद्या डामरे , सुवर्णा दळवी, सपना डामरे, आनंदी खरात , कृषी सहाय्यक श्री. बुदवळे , कृषी पर्यवेक्षक हुसेन आंबार्डेकर , ग्रामसेवक आर. डी. सावंत , संजय तांबे , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , उदय परब , विठ्ठल खरात , अनंत तांबे , परशुराम परब , सचिव अजय गोसावी , रघुनाथ लोके , संजय डगरे , महेश लोके , मनोज लोके , संदेश आचरेकर, प्रकाश आचरेकर ,विनायक दळवी , सुरेश मेस्त्री , दिपक तांबे , विजय नरे , दया लोके , प्रकाश डामरे , अनिल लोके , ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब , प्रकाश वाळके , सायली दळवी, सत्यवान घाडी आदींसह आरोग्य कर्मचारी, ग्रामस्थ , शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. ओगले म्हणाले, आंबा , काजू , केळी , नारळ कुठलीही झाडे लावली तरी त्याला रेतन देण्याची गरज आहे. म्हणजेच शेणखत द्या , पालापाचोळा द्या , औषधे मारा . झाडांना रासायनिक खते किंवा रासायनिक औषधे वाईट आहेत का ? तर नाही मात्र योग्य प्रमाणात त्याचा वापर शेतक-यांनी केला पाहिजे. काजु लागवड करत असताना त्याचे वय किती आहे यावर खतांचे डोस देणे आवश्यक आहे . काजु चे लागवड करताना २ झाडांमधील अंतर ७ मीटर असणे आवश्यक आहे. प्रत्येक एकरला सत्तर ते ऐंशी काजुची रोपे शेतक-यांनी लावावीत . खतांचा अतिरिक्त वापर हानिकारक आहे. झाडांची लागवड करताना मर्यादित अंतर ठेवणे आवश्यक आहे. झाडांना जास्त पाण्याची आश्यकता नाही , त्यांना वाफारा आवश्यक असतो. झाडांना वाईट सवयी आपण लावू नका.

आत्मा समिती व्यवस्थापक विनायक पाटील म्हणाले , कृषी विभागांअंकर्गत विविध योजना शेतक-यांसाठी राबवले जात आहेत. शासनाच्या धोरणानुसार काजु बागायतदार शेतक-यांसाठी गटशेती योजना राबवण्यात येत आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने शेतक-याने पुडाकार घ्यावा आम्ही सहकार्य करायला तयार आहोत.

सोसायटी चेअरमन भगवान लोके म्हणाले , शेतकरी मेळावा हा शेतक-यांना तज्ञांकडून मार्गदर्शन मिळावं यासाठी आयोजित केला आहे. त्यामागील मुख्य हेतू म्हणजे माझ्या गावातील शेतक-यांच्या शेती उत्पन्नात वाढ होईल या दृष्टीने आहे. प्रथमच सोसायटी मार्फत हा मेळावा आयोजित करुन शेतक-यांना दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. भविष्यात या मेळाव्यात कृषी तज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे पडीक क्षेत्रावर लागवड वाढेल,आणि शेती उत्पन्नात वाढ होईल .

या शेतकरी मेळाव्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन केल्याबद्दल गावाच्या वतीने प्रा. प्रसाद ओगले व आत्माचे व्यवस्थापक विनायक पाटील यांचा सत्कार चेअरमन भगवान लोके यांच्या हस्ते शाल, सुपारी वृक्ष देऊन करण्यात आला. कार्यंक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार ऋषिकेश मोरजकर यांनी केले.

You cannot copy content of this page