मुख्यमंत्र्यांकडून कोकणातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक धोरणाबाबत अपेक्षाभंग…

अर्चना घारे परब: उद्घाटन केली मात्र कामे मार्गे लावा; केसरकारांना कोपरखळी..

⚡सावंतवाडी ता.०७-: कोकणातील विद्यार्थी नेहमी दहावी बारावी बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांकावर असतात परंतु पुढच्या शिक्षणाबाबत त्यांनी ठोस धोरणात्मक घोषणा करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा होती, मात्र काल झालेल्या सभेत अपेक्षाभंग झाला.आशी टीका कोकण विभागीय राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सौ अर्चना घारे परब यांनी आज येथे केल.

दरम्यान केसरकारांनी शहरातील आजपर्यंत केलेले विकास कामांची उद्घाटन हे पूर्ण झालेलीच नाही त्यामुळे आता झालेली उदघाटना तरी पूर्ण करतील अशी अपेक्षा करू असा टोलाही त्यांनी यावेळी केसरकर यांना लगावला.त्या वंतवाडीत राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर महिला जिल्हा अध्यक्ष उद्योग व्यापार सौ दर्शना बाबर देसाई चराठा ग्रामपंचायत सदस्य सौ गौरी गावडे महिला शहराध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतुल्ला खान तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी शहर चिटणीस राकेश नेवगी अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष ईफ्तेकार राजगुरू तालुका उपाध्यक्ष बावतीस फर्नांडिस सौ. मारीता फर्नांडिस सौ पूजा दळवी आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page