प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांना कुडाळ व्यापारी संघटनेकडून शुभेच्छा

⚡कुडाळ ता.०६-: नगरपंचायतच्या प्रभारी नगराध्यक्ष पदी मंदार शिरसाट यांची वर्णी लागली आहे. यापूर्वी कुडाळ नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष पद मंदार शिरसाट यांनी भूषविले होते. मंदार शिरसाट यांनी मंगळवार, ६ जून पासून प्रभारी नगराध्यक्ष पदाचा कारभार हाती घेतला.


आज कुडाळ तालुका व्यापारी संघटनेतर्फे नगरपंचायत दालनात प्रभारी नगराध्यक्ष मंदार शिरसाट यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटना
अध्यक्ष श्रीराम शिरसाट, उपाध्यक्ष गोविंद सावंत, सचिव भूषण मठकर, खजिनदार नितीश महाडेश्वर, अभिषेक मठकर,
युवा उद्योजक ओंकार साळवी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page