⚡बांदा ता.०६-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत बिबवणे यांच्या संयुक्त विद्यमाने १५ वित्त आयोगांतर्गत बिबवणे ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच सौ. श्रुती कुडपकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक सौ. अन्वी शिरोडकर, कोकण संस्थेचे समन्वयक समीर शिर्के, लक्ष्मण देसाई, मिनरवास परब, डॉ. तेली, प्रदीप पवार, उमेश गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामध्ये गावातील महिला व पुरुषांची रक्त तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली.
यामध्ये एकूण ५४ लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला. सरपंच सौ. श्रुती कुडपकर यांनी या शिबिराला शुभेच्छा दिल्या व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून यापुढेही लोकोपयोगी शिबिरांचे आयोजन करण्याचे आश्वासन दिले. ग्रामसेवक सौ. अन्वी शिरोडकर यांनी आरोग्य शिबिरास शुभेच्छा दिल्या व कोकण संस्थेचे संस्थापक दयानंद कुबल यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवले जातात याचे कौतुक केले. कोकण संस्थेच्या वतीने समिर शिर्के यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
ग्रामपंचायत बिबवणे येथे कोकण संस्थेच्या वतीने आरोग्य शिबीर संपन्न
