प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे कणकवलीत पाणी टंचाई

सुशांत नाईक शिवाजीनगर, बिजलीनगर, नाथ पै नगर येथे केला पाणीपुरवठा

⚡कणकवली ता ०६-:कणकवलीतील गडनदीचे पात्र कोरडे पडल्याने शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे. मात्र, न. पं. प्रशासन व तत्कालीन सत्ताधाऱ्यानी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन कोणतेहि नियोजन न केल्यामुळे पाणी टंचाई उद्भवली आहे, असा आरोप युवासेनेचे जिल्हाप्रमूख तथा माजी नगरसेवक सुशांत नाईक यांनी केला.


सत्ताधाऱ्याच्या नाकर्तेपणामुळे कणकवली शहरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. न. पं. प्रशासन व भाजपचे पदाधिकारी मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यात मशगुल आहेत. पाणी टंचाईमुळे कणकवलीकरांचे हाल सुरु आहेत.
शिवाजीनगर, बिजलीनगर, नाथ पै नगर येथे आपण व माजी नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी स्वखर्चातून नागरिकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे, श्री.नाईक यांनी बोलताना सांगितले.

You cannot copy content of this page