पंढरपूर येथील राज्यस्तरीय अक्षर संमेलनात केला गौरव
मालवण दि प्रतिनिधी
पंढरपूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अक्षर संमेलनात कट्टा येथील वराडकर हायस्कूलची विद्यार्थ्यांनी सिंधू कन्या श्रेया समीर चांदरकर हिला राज्यस्तरीय अक्षर गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव श्री कैलास बिलोनीकर, महाराष्ट्र राज्याचे महसूल व वन विभागाचे सहसचिव श्री संजय इंगळे गृह विभागाचे सहसचिव श्री वेंकटेश भट , सौ शितल देवी मोहिते पाटील, श्री अभिजीत पाटील सहकारी साखर कारखाना चेअरमन पी आय श्री कुलकर्णी ,माझी शाळा माझा फळा समूहाचे प्रशासक व या अक्षर संमेलनाचे संयोजक सुलेखनकार श्री अमित भोरकडे सर, स्वागताध्यक्ष श्री प्रशांत वाघमारे ,श्री. ज्ञानेश्वर विजागत आदीसह विविध कलाकार आणि कलाप्रेमी उपस्थित होते.
. वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्ट्याची विद्यार्थिनी श्रेया समीर चांदरकर हिने धाग्यांपासून बनवलेल्या विविध कलाकृतींचे राज्यभरातील कला प्रेमींनी कौतुक केले. या पुरस्कारामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाक्षेत्रात बालकलाकारांच्या यादीत तिने मानाचे स्थान पटकावले. त्याचबरोबर या अक्षर संमेलनात तिने गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे दोऱ्यांच्या साहाय्याने चित्र रेखाटत अक्षर संमेलनासाठी जमलेल्या कला रसिकांना आपल्या कलेचे प्रात्यक्षिकही दाखवले.
तिच्या या यशाबद्दल कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त कर्नल शिवानंद वराडकर ,अॅड एस .एस .पवार अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर ,सचिव सुनील नाईक, विजयश्री देसाई ,सहसचिव साबाजी गावडे , खजिनदार रवींद्रनाथ पावसकर, स्कूल कमिटी चेअरमन सुधीर वराडकर, वराडकर हायस्कूल कट्ट्याचे मुख्याध्यापक श्री संजय नाईक या सर्वांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
