मंत्री रविद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर केले चहापान…

विकासकामाबाबत केली चर्चा

सावंतवाडी ता.०४-:
महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे वजन काय आहे हे सर्वानाच ज्ञात आहे. मात्र असे असताना सुद्धा कोणताही बडेजाव न करता ते नेहमीच कार्यकर्त्यांसोबत मिळून मिसळून असतात याचाच प्रत्यय आजही सावंतवाडीत आला.

मंत्री रवींद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर आहेत ते सावंतवाडीत आले असताना त्यानी सायंकाळी मोती तलावाच्या काठावर एका हॉटेलमध्ये पदाधिकाऱ्यांसमवेत चहापान केले.
यावेळी त्यांनी शहरातील विविध विकास कामाबाबत पदाधिकाऱ्यांकडून माहिती घेतली यावेळी त्यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक आनंद नेवगी, बंटी पुरोहित, हेमंत बांदेकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page