बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा वेत्ये ग्रामपंचायतीकडून गौरव…

वेत्ये गावातील दोन कर्तबगार महिलांचाही अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मान..

⚡सावंतवाडी ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून वेत्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील बारावी उत्तीर्ण विद्यार्थाचा गौरव केला. तर वेत्ये गावातील श्रीम संतोषी संतोष गावकर व श्रीम नुतन सुशिल कोकुळकर या कर्तबगार
महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मान केला.

यावेळी सरपंच गुणाजी गावडे ग्रामपंचायत सदस्य भगवान गावडे,राजेंद्र आंबेकर, महेश गावडे, तन्वी गावकर,नंदिनी निगुडकर, रमेश गावकर,ग्रामस्थ गुरुदास गावकर, संतोष गावडे,शरद जाधव, सत्यवान गावडे,शुशिल कोकुळकर,मनोज पाटकर,हरिश्चंद्र गावकर,आनंद नाईक,सुरेश घारगळकर,एकनाथ गावडे,शंकर गावकर,संजय गावकर, रमेश जाधव तसेच बचत गट महिला उपस्थीत होते.


यावेळी वेत्ये ग्रामसेवक श्री राजेश रामचंद्र परब यांची बदली निमीत्त निरोप समारंभ आयोजित करत त्यांना पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page