*स्वराज्य संघटनेने आयोजित केलेल्या किल्ला बनवणे स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न*

*💫सावंतवाडी दि.२५-:* स्वराज्य संघटनेने यावर्षी आयोजित केलेल्या किल्ला बनवणे स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल संपन्न झाला आहे. या स्पर्धेला स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शवला होता. सिंधुदुर्ग महिला कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले होते. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना व नवीन पिढीला प्रोत्साहन मिळावे यासाठी कॉंग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी व कॉंग्रेस तालुका उपाध्यक्ष समीर वंजारी यांनी दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस दिले आहे. यावेळी दोघांनीही पुढील वर्षी याही पेक्षा मोठा कार्यक्रम व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

You cannot copy content of this page