⚡देवगड ता.२६-: देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील मच्छीमार पंढरीनाथ सदाशिव सनये हे नेहमीप्रमाणे समुद्रात मासेमारीसाठी जात असते वेळी समुद्राच्या लाटांनी त्यांची नौका मिठबांव गजबादेवी मंदिर नजिक समुद्रात बुडाली यामध्ये नौकेच इंजिन खडकावर आदळल्याने इंजिनाचे देखील नुकसान झाले आहे,
नौकेवर असलेल्या लाईफ जॅकेटच्या सहाय्याने पंढरीनाथ सनये व मंदार सनये हे सुखरूप समुद्रकिनारी पोहोचले,
स्थानिक मच्छीमारांच्या सहाय्याने बुडालेली नौका समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले,
नौका आणि नौकेवरील इंजिन तसेच जाळ्यांचे अडीज ते तीन लाखांचे नुकसान झाले आहे, मत्स्य व्यवसाय विभागाने संबंधित घटनेची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी नुकसान ग्रस्त मच्छीमार पंढरीनाथ सदाशिव सनये यांनी मागणी केली आहे,
मिठबांव समुद्रात मासेमारी नौका बुडाली
