बिल माफ करण्यासाठी शासन स्तरावर प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय
देवगड( प्रतिनिधी)
देवगड न.पं.ची सर्वसाधारण सभा पाणी व सांडपाणी निचरा या
विषयावरून गाजली.मे महिन्यात नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा न
झाल्याने एक महिन्याचे बील आकारू नये अशी मागणी नगरसेविका
तन्वी चांदाेस्कर यांनी केली. तर दाेन महिन्याचे बील घेवू नका
अशी मागणी पाणीपुरवठा समिती सभापती संताेष तारी यांनी
केली.नगरसेवकांच्या सुचना शासनस्तरावर मार्गदर्शनासाठी
पाठवु असे मुख्याधिकारी संताेष जिरगे यांनी
सांगीतले.काेल्डमिक्स व हाॅटमिक्स रस्ते या विषयावरून सत्ताधारी व
विराेधी नगरसेवक यांच्यामध्ये जुंपली.अखेर मतदान घेवून या विषयावर
मार्ग काढ;ण्यात आला.
देवगड जामसंडे न.पं.ची मासिक सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा साक्षी
प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली न.पं.सभागृहात पार पडली.या सभेला
उपनगराध्यक्षा साै.मिताली सावंत, मुख्याधिकारी संताेष जिरगे,
बांधकाम सभापती तेजस मामघाडी, पाणीपुरवठा सभापती संताेष
तारी, स्वच्छता सभापती विशाल मांजरेकर उपस्थित हाेते.
पाणीप्रश्न सभेत चांगलाच गाजला.दुरूस्त करून आणलेला पंप
जळाल्यानंतर एकाच पंप व माेटरवरून सध्या दहिबांव नळयाेजनेवरून
पाणीपुरवठा हाेत असून ताेही नादुरूस्त झाल्यास देवगड
जामसंडेचा पाणीपुरवठा १५ दिवस बंद राहील अशी धक्कादायक
माहिती न.पं.सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा विभागामार्फत देण्यात
आली.यावेळी नादुरूस्त यंत्रणा तात्काळ दुरूस्त करण्यासाठीची
कार्यवाही सुरू करूया सर्व सदस्यांचे एकमत झाले.
न.पं.कार्यक्षेत्रामध्ये विकास कामांसंदर्भातील प्रस्तावित सर्व रस्तेे
हाॅट मिक्स व बी.बी.एम् कार्पेट। करणे तसेच अरूंद रस्ते असतील अशा
ठिकाणी आवश्यकतेनुसार काेल्ड मिक्स करणेबाबत विचारविनिमय
करणे हा विषयपत्रिकेवरील विषय सभेत चांगलाच गाजला.शहरातील सर्वच
रस्ते हाॅट मिक्स करावेत अशी मागणी सत्ताधारी नगरसेवक बुवा
तारी यांनी लावून धरली तर विराेधी नगरसेविका साै.प्रणाली माने
यांनी शहराच्या भाैगाेलिक स्थितीचा विचार करून
आवश्यकतेनुसार हाॅट;मिक्स व काेल्ड;मिक्स रस्ते करावेत अशी
मागणी केली यावर नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनीही पर्यटनाच्या दृष्टिने
दर्जेदार रस्ते व्हावे यासाठी हाॅटमिक्स रस्ते हाेणे गरजेचे आहे
असे मत व्यक्त केले मात्र हाॅटमिक्स रस्त्यांना आमचा विराेध नाही
परंतू ५००मीट;र रूंदीच्या खालील रस्ते असतील तर त्यांना
काेल्ड;मिक्सचा पर्याय ठेवावा.या विषयावरून सत्ताधारी व विराेधक
आमनेसामने आले.अखेर मतदान घेण्यात आले.सत्ताधारी आठ
नगरसेवकांनी हाॅटमिक्सच रस्ते व्हावेत या बाजुने मतदान केले
तर आवश्यकतेनुसार काेल्डमिक्स रस्ते करावेत, हाॅटमिक्सला
विराेध नाही अशी भुमिका मांडून त्या बाजुने भाजपा नगरसेवक व
उपनगराध्यक्षा साै.मिताली सावंत अशा ९जणांनी मतदान केले.
पेट्रोलपंप रस्ता पावसाळ्यात पाणी साचुन ब्लाॅक हाेणार
फाटाक क्लास समाेर नवीन हाेत असलेल्या संकूलामुळे भराव
टाकल्याने पावसाळ्यात ओहळातून जाणारे पाणी अडून रस्त्यावर
येण्याची भीती न.पं.सभेत व्यक्त करण्यात आली.यामुळे पेट्रोलपंप येथे
पावसाळ्यात पाणी साचुन देवगड जामसंडे संपर्क तुटू शकताे
यावर पावसाळ्यापुर्वी उपाययाेजना करणे गरजेचे आहे असे मत
बुवा तारी यांनी मांड;ले.यावर नगरसेविका साै.अरूणा पाटकर
यांनीही याबाबत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून उपाययाेजना
करण्याबाबत कार्यवाही करावी अशी सुचना मांडली.
प्रत्येक संकूलांकडूसांडपाणी निचरा बाबत नियाेजन
करण्याचा सुचना देवून ज्या काॅम्प्लेक्सधारकांकडून व्यवस्थित
उपाययाेजना हाेत नाही व सांडपाणी उघड-यावर साेडण्यात येत
आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी सुचना करण्यात
आली.साडपाणी निचरा या प्रश्नाबाबत विशेष सभा बाेलवून निर्णय घ्या
अशी मागणी भाजपा गट;नेते शरद ठुकरूल यांनी केली तर तन्वी
चांदाेस्कर यांनी सांड;पाणी निचरा याेग्य रितीन हाेण्यासाठी
संकूलधारकांनी शाेषखड्डकाढून ते सक्षण करावे अशी सुचना
केली.
देवगडमध्ये ७ मे राेजी सनसेट पार्टीचे आयाेजन करण्यात आले
हाेते.अशा पार्ट्याआयाेजित करणे निषेधार्ह आहे.सभेत निषेध
करीत असल्याचे भाजपा गटनेते शरद ठुकरूल यांनी सांगीतले.या
पाटर्याचें शहरात बॅनर लावणा-यांवर प्रशासनाने कारवाई का
केली नाही असा प्रश्न तन्वी चांदाेस्कर यांनी केला.दाेन वर्षेे
हाेवून गेली तरी देवगड जामसंडे शहरात दाेन ठिकाणी उभारलेली
वाॅटर एटटीएम् सुरू नाहीत याकडे नितीन बांदेकर यांनी लक्ष
वेधले.प्रभाग १४ मधील अंगणवाडची दुरावस्था झाली आहे याकडे
नगरसेविका अरूणा पाटकर यांनी लक्ष वेधले.
पवनचक्की गाडर्न येथे स्थानिक नागरिकांना व्यवसाय करण्यास
प्राधान्य द्यावे.बाहेरील व्यक्ति येवून व्यवसाय करतात व स्थानिक
व्यावसायिकांना दादागीरी करतात हे याेग्य नसून यामुळे बाहेरील
काेणत्याही व्यक्तिस व्यवसाय करण्यास न देता स्थानिक नागरिकांनाच
प्राधान्य द्यावे अशी मागणी साै.प्रणाली माने यांनी केली.
उघड-यावर शाैचालयास बसणा-याचे गुडमाॅर्निंग पथकाद्वारे
गुलाबपुष्प देवून स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम न.पं.मार्फत
घेण्यात येणार आहे अशी माहिती स्वच्छता सभापती विशाल मांजरेकर
यांनी दिली..
