शासन आपल्या दारी महत्त्वाकांक्षी, प्रभावी उपक्रम

आ नितेश राणे यांचे प्रतिपादन

देवगड
शासन आपल्या दारी हा महत्त्वाकांक्षी प्रभावी कार्यक्रम असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम राबविला जात असताना समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत शासन पोचले पाहिजे व शासन आहे असे समजले पाहिजे या उद्देशाने राबविला जात असून लाभार्थ्यांना योजना समजावून सांगणे व त्यावर योग्य ती कार्यवाही केली तरच लाभार्थ्यांना समाधान मिळेल.


हे रयतेचे राज्य म्हणून जनतेला समजणे आवश्यक असून त्याकरिता अधिकारी आणि प्रशासनाने महत्त्वाची भूमिका पार पडणे आवश्यक आहे. लोकांपर्यंत पोहोचत असताना आदर्श शासन व कल्याणकारी शासन म्हणून या शासनाकडे पाहणे यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीने हे काम न करता शिवसेना-भाजप सरकार लोकांच्या जीवनात परिवर्तन करत आहेत व या अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत विविध योजनेचा लाभ दारापर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याने महाराष्ट्र शासन हे माझे शासन आहे ही भावना निर्माण होणे महत्त्वाचे आहे , शासकीय निधी शासकीय योजनांचा लाभ जनतेला मिळवून देणे त्यांच्या अडचणी दूर करणे यासाठी आपण जनतेचे सेवक आहोत व सेवा देणे यासाठी आपल्याला पदी दिली आहेत या पद्धतीने अधिकारी आणि प्रशासनाने काम करणे अशी अपेक्षा लोकांची जनतेची अपेक्षा आहे या पदांमधून आपण जनतेला आपल्या पदाला खुर्चीला काय न्याय देतो यामधून या कार्य कार्यक्रमाचे यश बघितले जाते .
असे प्रतिपादन आम. नितेश राणे यांनी जामसंडे येथे आयोजित केलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या उदघाटन,सोहळ्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र शासन शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी शासन आपल्या दारी व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत भात शेती व गुणवत्ता सुधार प्रकल्पांतर्गत कृषी प्रदर्शन कृषी महोत्सवाचे आयोजन जामसंडे येथील श्री मो गोगटे सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन आम. नितेश राणे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यावेळी व्यासपीठावर माजी आम. अजित गोगटे जिल्हा अर्बन बँक अध्यक्ष सदाशिव ओगले, कृषी विभाग अधीक्षक विजयकुमार राऊत, गटविकास अधिकारी तथा आयएएस अधिकारी करिष्मा नायर ,तहसीलदार स्वाती देसाई तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे, पशुधन अधिकारी डॉ. घोगरे डॉ. ढेकणे, मत्स्यवसाय अधिकारी रवींद्र मालवणकर ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र राठोड उपस्थित होते.
शासन आपल्या दारी आपल्या दारी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार स्वाती देसाई व कृषी प्रदर्शन कृषी महोत्सवाचे प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी केले यानिमित्त काढण्यात आलेल्या कृषी पत्रिकेचे अनावरण मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. विजयकुमार राऊत यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम नागरिकांपर्यंत पोहोचणे हाच महत्त्वाचे उद्देश असून उत्पादकता व उत्पादन वाढल्यानंतर न थांबता मूल्यवृद्धी प्रोसेसिंग होणे महत्त्वाचे आहे आणि यासाठी कृषी विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले .
उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर यांनी शासकीय योजनांची जत्रा अशा पद्धतीचा यापूर्वीचा कार्यक्रम सद्यस्थितीत शासन आपल्या दारी म्हणून राबवीला जात असताना शासनाने प्रशासनाने या उपक्रमाद्वारे नागरिकांना माहिती देणे फॉर्म भरून घेणे व विविध योजनांची माहिती नागरिकांचे पर्यंत पोहोचविणे व त्यांच्या लाभ देणे हाच महत्त्वाचा उद्देश असून सर्वसामान्य नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच ह्या नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने सर्व नागरिकांनी पर्यंत प्रचार व प्रसार होणे त्यांना लाभ देणे व ही संकल्पना संकल्पना समजावून सांगण्यासाठी २१ विभागात मंडळ स्तरावर हे अभियान या पुढील काळात घेणार असल्याचे आवर्जून सांगितले व हे अभियान राबवित असताना यापुढील कालावधीत ते परिपूर्णपणे राबविले जाईल असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान आवास योजना लाभार्थी, पुरवठा विभाग ,संजय गांधी योजना, पाणीपुरवठा विभाग, हागणदारी मुक्त ग्रामपंचायत, सेतू सुविधा दाखले, एकात्मिक बाल विकास लाभार्थी, महात्मा गांधी रोजगार योजना, काजू लागवड लाभार्थी ,मत्स्य व्यवसाय लाभार्थी, भात पीक स्पर्धा महिला लाभार्थ्यांना व लेखी आदेश व लाभ मान्यवरांच्या हस्ते आम. नितेश राणेंचे हस्ते प्रदान करण्यात आले.
यापुढे बोलताना आम. नितेश राणे म्हणाले जिद्द व चिकाटी प्रत्येक प्रशासनातले अधिकाऱ्याने अंगी बाळगली तर निश्चितपणे परिवर्तन होऊ शकते व लाभार्थी अथवा नागरिकांच्या समस्या व त्यांना मिळणारे लाभ हे त्यांची सोडवणूक केली तर निश्चितपणे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू शकते व आपण दिलेल्या न्याय योग्य आहे असे जनतेला वाटणे महत्वाचे आहे

You cannot copy content of this page