शिक्षणमंत्री केसरकर:राऊत यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव करण्याचा दिला इशारा
सावंतवाडी ता.२५-: युद्धात उतरल्यावर समोर भाऊ असला तरी त्याचा पराभव करावा लागतो. जर खासदार विनायक राऊत आपल्यासमोर उभे राहून पराभवाची धुळ चाखण्याचे आव्हान देत असतील तर त्यांचे आणि माझे चांगले संबध असतांनाही जर पक्षाने लोकसभा लढविण्याची परवानगी दिल्यास त्यांचा पराभव करण्यास मला अनिवार्य ठरेल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट करीत लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
