“पटेकर्स फ्रेश मार्ट”चा शानदार शुभारंभ

बाजारभाव, ऑनलाईन पेक्षा रास्त दरात वस्तू उपलब्ध

सावंतवाडी : शहरातील पटेकर बंधूंचा ड्रिम प्रोजेक्ट असणाऱ्या ‘पटेकर्स फ्रेश मार्ट’ चा शानदार शुभारंभ गुरूवारी पार पडला. सौ. मोहिनी पटेकर व परशुराम पटेकर यांच्या शुभहस्ते फित कापून या मार्टचं उद्घाटन करण्यात आले. गणेश प्लाझा, विठ्ठल मंदिर रोड, कलावती आई मंदिर समोर, जुनाबाजार येथे हे ‘पटेकर्स फ्रेश मार्ट’ ग्राहकांच्या सेवेत रूजू झाले आहे. बाजारभाव आणि ऑनलाईपेक्षा कमी किंमतीत येथे सर्व वस्तू उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

गुरूवारी ‘पटेकर्स फ्रेश मार्ट’ चा शानदार शुभारंभ सौ. मोहिनी पटेकर व परशुराम पटेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील या नव्या मार्टला सदिच्छा भेट दिली. या मार्टमध्ये रोजच्या गृहपयोगी वस्तू, बेकरी प्रोडक्ट, सौंदर्य प्रसाधने, मसाले, कडधान्य यासह आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, गिफ्ट आयटम, ब्रँण्डेड सॅक, बेडशीट, कपडे, बेबी टॉईस यासारख्या अनेक वस्तू माफक दरात एकाच छताखाली उपलब्ध आहेत. ग्राहकांना ऑनलाईनपेक्षा स्वस्त वस्तू येथे उपलब्ध करुन दिल्यात. उद्घाटना निमित्त विविध उत्पादनांवर स्पेशल डिस्काउंट देखील ठेवण्यात आले आहे. याप्रसंगी मोहिनी पटेकर, परशुराम पटेकर, दीपक पटेकर,
महेंद्र पटेकर, भुमी पटेकर, पुजा पटेकर, निमिष पटेकर, मैथिली पटेकर, गोपाळ हरमलकर, वैभवी हरमलकर-पटेकर, माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, अँड. अनिल निरवडेकर, प्रविण केसरकर, वैभव कुडतरकर, अनामिका चव्हाण, शरद शेटकर, विनिता सातार्डेकर, बिपीन सातार्डेकर, प्रकाश बोवलेकर, कमलेश चुनेकर, फ्रान्सिस रॉड्रिग्ज, गिरीश धुरी, फटी नाईक आदी उपस्थित होते.नव्यानं सुरु होणाऱ्या या ‘पटेकर्स फ्रेश मार्ट’ला एकदा अवश्य भेट द्या अन् मनमुराद खरेदी करा असं आवाहन पटेकर कुटुंबियांनी केलय.

You cannot copy content of this page