३६ लाखचा मुद्देमाल जप्त; अबकारी खात्याच्या पथकाची पत्रादेवी तपासणी कारवाई..
बांदा/प्रतिनिधी
गोव्याहून मुंबईच्या दिशेने ट्रक मधून बेकायदा होणाऱ्या दारू वाहतुकीवर गोवा अबकारी खात्याच्या पथकाने पत्रादेवी तपासणी नाक्यावर कारवाई करत २२ लाख रुपये किमतीच्या दारुसह एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आज सायंकाळी उशिरा करण्यात आली.
कर्नाटक विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गोवा अबकारी तपासणी नाक्यावर वाहनांची कसून तपासणी सुरु होती. सायंकाळी उशिरा नाक्यावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला (एमएच ११ बीएल ९८८४) तपासणीसाठी थांबविण्यात आला. पाठीमागील हौद्यात सिमेंटचे ब्लॉक भरण्यात आले होते. अबकारी खात्याच्या पथकाला संशय आल्याने गाडीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे खोके मोठ्या प्रमाणात भरलेले आढळले. पथकाने २२ लाख रुपये किमतीची दारू व १५ लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ३७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई अबकारी निरीक्षक कमलेश माजिक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने केली.
