डॉ. जयेंद्र परूळेकर : संजू परब नगराध्यक्ष असतानाची पाणीटंचाई अद्यापही सुरूच
⚡सावंतवाडी ता.०९-: आमदारकीसाठी दिपक केसरकर व राजन तेली हे दोघे किती ही भांडले तरी जनतेच्या मनात असलेली व्यक्ती आमदार होणार अशी प्रतिक्रिया डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी आज येथे दिली.दरम्यान शहरात संजू परब नगराध्यक्ष असताना पाणीटंचाई सुरू झाली असून ती अध्यापिही सुरू आहे. त्यामुळे पाणी कुठे मुरतंय हे कोडच आहे.असे ही परूळेकर म्हणाले.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना म्हाणले की शहरातील पाणी प्रश्नावरुन सत्ताधारी मंडळी नागरिकांची दिशाभूल करत आहे. कोणी कीती निधी आणला यापेक्षा पाण्याचा प्रश्न मिटविण्यावर सत्ताधाऱ्यांकडून लक्ष देण्यात यावा असे मत त्यांनी मांडल.
ते म्हणाले, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सावंतवाडी शहराच्या नळ योजनेसाठी 56 रुपये मंजूर केले आहेत मात्र शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणतात आपण नळ योजनेसाठी तीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. 56 कोटीची योजना पुढच्या पन्नास वर्षासाठी आहे तीची अंमलबजावणी होण्यास आणखी तीन चार वर्षे लागणार आहे.परंतु संजू परब नगराध्यक्ष असल्यापासून शहरात पाणीटंचाई सुरू आहे. त्यांच्या कार्यकाळात डिसेंबर मध्येच पाणीटंचाई होती .ती अद्यापही सुरू आहे.
शहराच्या नळ योजनेसाठी कोट्यावधी रुपये मंजूर केले असतील तर कामे का सुरू होत नाहीत. लोकांना पाण्यासाठी का भटकावे लागत आहे त्यामुळे कोणी कीती निधी आणला यापेक्षा पाणी
प्रश्न सोडवण्यावर या नेत्यांनी भर द्यावा असे ही ते म्हणाले
