राजकारणातही “मैत्री” जपणारा युवा कार्यकर्ता…

भाजपा किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत; “ग्लोबल महाराष्ट्र” कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा….!!!

⚡सावंतवाडी ता.०७-: शिवसेना शाखाप्रमुख ते भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस असा राजकीय प्रवास करतांना राजकारणातही मैत्री जपत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा भाजपाचा युवा कार्यकर्ता म्हणजे माजगाव येथील अजय सावंत होय. तालुक्यासह गावात राजकारण करतांना सर्वाशी मैत्रीपुर्ण जोडलेले संबधच त्याला गावच्या ग्रामपंचायतीवर गेली कित्येक वर्षाची असलेली विरोधकांची सत्ता खेचून आणण्यात उपयोगी ठरले.अशाच या प्रेमळ व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस साजरा होत आहे त्यानिमित्त “ग्लोबल महाराष्ट्र” कडून त्यांच्या जीवन प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

श्री अजय सावंत यांचा जन्म सर्व सामान्य कुटुंबात झाला वडील सरकारी नोकरीत होते. शालेय जीवनातून पदवीपर्यंतचे शिक्षण घेत पुढे त्यांनी पंधरा वर्षे मर्चंट नेव्हीत नोकरी केली मुळात अजय सावंत यांचे आजोबा अनंत गोविंद सावंत हे गावचे पंधरा वर्षे सरपंच म्हणून राहिले होते त्यामुळे अजय सावंत यांच्या कुटुंबाला समाजसेवेबरोबरच राजकारणाची पार्श्वभूमी आहे. मर्चंट नेव्हीतील आपली पंधरा वर्षाची नोकरी पूर्ण केल्या नंतर अजय याने गावात स्वतःच्या व्यवसायाबरोबरच समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले घरच्यांबरोबरच पत्नी डॉ.सौ. अर्चना सावंत यांची त्यांना मजबूत साथ मिळाली. समाज कार्य करत असताना त्यांनी शिवसेनेतून सात-आठ वर्षांपूर्वी प्रवेश केला सुरुवातीला शाखाप्रमुख म्हणून गावात काम केले शिवसेनेच्या माध्यमातून, भारतीय जनता पक्षातील त्यांची इंट्री ही ओघाओघानेच झाली, माजगाव मध्ये फारशी भाजपची ताकद नसतांना सध्याचे जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी त्यांना भाजपात प्रवेश दिला गावातील लोकांमध्ये असलेला संपर्क, समाजकार्यात असलेली आवड आणि लोक मतांचा विचार करत श्री सारंग यांनी कुठलाही विचार न करता थेट बुथ अध्यक्ष पदाची जबाबदारी अजय सावंत यांच्या खांद्यावर टाकली. श्री सावंत यांनी हसत हसत ही जबाबदारी स्वीकारली आणि तिथपासून स्वतःला सक्रीय राजकारणात झोकून दिले.

पुढे त्यांना सावंतवाडी चे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्यासह राजकारणातील चाणक्य म्हणून ज्यांची ओळख असलेले मनोज नाईक यांची भक्कम साथ लाभली. सर्वांच्या सहकार्याने गावात भाजप पक्षाचे संघटनात्मक केलेले काम लक्षात घेता पक्षाकडून पुढे त्यांच्यावर शक्ती केंद्रप्रमुख म्हणून जबाबदारी टाकण्यात आली यातही त्यांनी स्वतःला सिद्ध केले त्यानंतर विभागीय अध्यक्ष आणि आता त्यांच्याकडे किसान मोर्चा जिल्हा चिटणीस हे पद देण्यात आले आहे. मुळात पक्षाचे काम करत असताना गावातील पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना मानसन्मान देत त्यांचे मार्गदर्शन स्वीकारून त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी काम केले.

यामध्ये त्यांना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत, बाळा वेजरे, श्याम कासार, सुधीर वारंग,सचिन बिर्जे,बाबु गावडे, विजय सावंत, सचिन मोरजकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

गावात राजकारण करत असताना त्यांनी कधीच मैत्रीमध्ये राजकारण आणू दिले नाही. राजकरण आणि मैत्री हे दोन वेगवेगळे संबंध त्यांनी नेहमीच जोपासण्याचा प्रयत्न केला. आजही त्यांचे इतर पक्षातील लोकांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. गरजू – गरिब,अडल्या नडलेल्यांवर त्याचा नेहमीच सहकार्याचा हात राहीला आहे. रात्री अपरात्री प्रसंगाला धावून जाण्याबरोबरच गावातील धार्मिक, सामाजिक,शैक्षणिक कार्यातही त्यांचा हिरहिरीने सहभाग राहिला आहे. गावात सर्वांशी जोडलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांचा फायदा अलीकडे झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये त्यांना झाला. या निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती डॉ. सौ.अर्चना सावंत यांच्या भरघोस मताधिक्याने विजय झाला आणि गेले कित्येक वर्ष विरोधकांच्या हातात असलेली माजगाव ग्रामपंचायत खेचून आणण्यात त्यांना यश मिळाले. भविष्यात राजकारणात काम करत असताना कुठलीही अपेक्षा न बाळगता पक्षासाठी स्वतःला झोकून देत कम करणार आहे.पक्षाच्या माध्यमातून ग्रामस्थांना विश्वासात घेत गावातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपली धडपड राहणार आहे यामध्ये माजगाव धरण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी व गावातील पाणी प्रश्न कायमचा मिटवण्यासाठी आपले प्राधान्य असणार आहे. त्यानंतर कचरा डेपो निर्माण करणे याशिवाय इतर नागरिकांचे असलेले प्रश्न सोडवण्यावर भर राहणार आहे. भविष्यात तालुका, जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाल्यास त्या संधीचेही नक्कीच सोने करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अशा या महत्वाकांक्षी व्यक्तिमत्वाला “ग्लोबल महाराष्ट्र” कडून वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा….!!!

You cannot copy content of this page