चोरट्या वाळू वाहतुकीला दोडामार्ग पोलिसांचा दणका

डंपरसह ३६ लाखाचा मुद्देमाल जप्त;वाळू माफियांचे धाबे दणाणले…

⚡दोडामार्ग ता.०७-: वाळू वाहतुकीचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाळू माफियांना दोडामार्ग पोलीसांनी शनिवारी चांगलाच दणका दिला.येथील बाजारपेठेतून वाहतूक करणाऱ्या एकूण चार डंपर वर कारवाई करत ते जप्त केले.बऱ्याच दिवसांनंतर महसूल विभागाचे काम पोलीसांनी चोख बाजावल्याने नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत होत असून वाळू माफियांचे धाबे मात्र चांगलेच दणाणले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुडाळ येथून चार डंपर दोडामार्गात येत होते. यावेळी हे चार डंपर दोडामार्ग बाजारपेठेत आले असता तेथील पोलीस कर्मचारी उमेश देसाई यांनी या डंपरना तपासणीसाठी थांबविले व त्यांच्याकडे त्यांच्या गाडीचे कागदपत्रे व वाळू वाहतूकीचा परवाना दाखवा असे सांगितले. त्यावेळी सदर वाळू वाहतूक करणाऱ्यांकडे कायदेशीर वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी सदर चारही डंपर पोलिस ठाण्याच्या आवारात आणत त्यांच्यावर वाळू बिगर परवाना गैर कायदेशीर वाळूचा राॅयल्टी अगर परवाना न घेता चोरुन घेवून जात होते म्हणून  गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये
संशयित आरोपी विजय हनुमान जाधव ( वय 30, रा. पिंगुळी ता कुडाळ, मूळ रा. यादगिरी विजापूर, कर्नाटक ), रियाज ताली कोठ ( वय २४, रा. कुडाळ रेल्वेस्टेशन जवळ, मूळ रा. कलकेरी, विजापूर कर्नाटक ), प्रकाश शंकर राठोड ( वय 32, रा. नेरूरपार, कुडाळ, मूळ रा. मुद्देबिहाळ, विजापूर, कर्नाटक ), विनोद मोतीराम राठोड ( वय 28, रा. गुडीपूर ता. कुडाळ, मूळ रा. मुद्देबिहाळ विजापूर कर्नाटक ) यांच्यावर भा. द. वी. कलम 379, 94 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शिवाय एकूण चारही डंपर व वाळूसहित 36 लाख 64 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page