अवघ्या तीन महिन्यात महेश सारंग यांनी निधी केला उपलब्ध;पालकमंत्री चव्हाण यांनी केले भूमिपूजन
⚡सावंतवाडी ता.०६-: आंबेगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील आंबेगाव म्हारकाटेवाडी ते मधलीवाडी रस्ता हा बरीच वर्ष प्रलंबित होता. सदर वाडीवरील लोकांची होणारी गैरसोय लक्षात घेता जिल्हा बँक संचालक महेश जी सारंग यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण चव्हाण यांच्या सहकार्यातून दोन कोटी बावन्न लाख रुपये बजेट असणारा तीन किलोमीटर लांबीचा रस्ता अवघ्या तीन महिन्यात मंजूरी दिली.सदर रस्त्याचे भूमिपूजन आज जिल्हा बँक संचालक महेश जी सारंग यांच्या हस्ते पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब,मनोज नाईक,आंबोली मंडल अध्यक्ष रवी मडगावकर,,श्री अरुण उंडे तहसिलदार, गटविकास अधिकारी मा.वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी
मा.प्रशांत चव्हाण,श्री शिवाजी उर्फ संजू परब सरपंच,आंबेगाव,श्री रमेश गावडे उपसरपंच आंबेगाव, ग्रा.पं.श्री योगेश गवळी सौ.साक्षी राउळ,सौ.आनंदी मुळीक,श्री दीपक बर्वे,संतोष राणे बुथ अध्यक्ष,ज्ञानेश्वर परब,नामदेव परब,माजी सरपंच वर्षा वरक ,अण्णा केळुस्कर,प्रदीप केळुस्कर,संजू गावडे,रवि गावडे,भावाशी कुंभार,दिनेश सारंग कोलगाव उपसरपंच,सोनिया सांवत सरपंच कूनकेरी,सौ आरती माळकर सरपंच कारिवडे,संदीप हळदणकर,सुनिल परब कुनकेरी उपसरपंच,प्रमोद सावंत माजी सभापती,अशोक माळकर,आनंद तळवणेकर,यशवंत आंगचेकर,जयराम गोसावी,तुकाराम राऊळ इ.भाजपा पदाधिकारी नेते व आंबेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
