वैभववाडी संजय शेळके
सांगुळवाडी गावचे ग्रामदैवत श्री भगवतीदेवी मंदिराचा जीर्णोद्धार कलशारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा येत्या 9 10 व 11 मे रोजी संपन्न होणार आहे.
मंदिराचे कलशारोहण सांगुळवाडी दत्त दरबारचे प .पू. स्वामी विठ्ठल राणे महाराज यांचे यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याला मंगळवारी 9 मे रोजी सुरुवात होणार असून या दिवशी जलयात्रा, देवतांना आवाहन,महागणपती पूजन, आग्री स्थापना, मूर्तीची शुद्धी, वास्तु होम, महाप्रसाद, तर दुसऱ्या दिवशी स्तलशुद्धी, स्थापित देवांचे पूजन मुख्य देवता हवन, जलधारा महाआरती, प्रार्थना, तसेच तिसऱ्या दिवशी मंदिराचा कलशारोहण सोहळा होईल. तिन्ही दिवशी सायंकाळी ओमकार प्रसादिक भजन मंडळ फोंडाघाट यांचे सुस्वर भजन असे सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याचबरोबर महिलांसाठी होम मिनिस्टर आणि तरुणांसाठी अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा होईल असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी मोठे संख्येने उपस्थित राहावे असे आवाहान सांगुळवाडी ग्रामस्थांचे वतीने करण्यात आलेले आहेत.
सांगुळवाडी भगवती मंदिराचा ९ पासून जीर्णोद्धार, कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना
