मालवणला मुसळधार अवकाळी पावसाने झोडपले….

बाजारात आलेल्या साऱ्यांची एकच धावपळ;आंबा, काजू पिकांचे नुकसान होण्याची शक्यता

*💫मालवण, दि.२२-:* गेले दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचे धुमशान सुरू असताना यातून सुटलेल्या मालवण तालुक्याला आज वरूण राजाने अचानक सायंकाळी हजेरी लावली अचानक सुरू झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने मालवणला झोडपून काढले. या पावसामुळे बाजारात आलेल्या साऱ्यांची एकच धावपळ उडाली. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात अवकाळी पाऊस पडत आहे. आज तालुक्यात सकाळच्या सत्रात काही ठिकाणी पाऊस पडला तर दुपारी शहरात मुसळधार पाऊस झाला. ऐन ग्रीष्म महिन्याच्या सुरवातीस कोसळलेल्या या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

You cannot copy content of this page