*💫सिंधूदुर्गनगरी दि.२२-:* अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या डिगस राणेवाडी वाडी येथील संभाजी उर्फ आनंद अशोक राणे (२५) या संशयितास जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपीच्या वतीने ऍड अशपाक शेख यांनी काम पाहिले. कुडाळ तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा फायदा घेत 13 नोव्हेंबर 2020 रोजी तिला फूस लावून पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांकडून 14 रोजी पोलीस स्थानकात देण्यात आली होती . त्यानुसार करण्यात आलेल्या तपासात संभाजी राणे याला पोलिसांनी 29 नोव्हेंबर 2020 रोजी अटक केली होती. 30 नोव्हेंबर रोजी जिल्हा विशेष न्यायालयाने त्याला 3 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. तर 3 डिसेंबर नंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. दरम्यान दोन महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या या संशयित आरोपीने दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर जिल्हा विशेष न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज सादर केला होता.
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयितास १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर….
