विजकनेक्शन तोडणी विरोधात भाजपचे २४ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गसह राज्यात जेलभरो आंदोलन…

भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची पत्रकार परिषदेत माहिती

*💫कणकवली दि.२२-:* विजबिलमाफी मिळावी आणि थकीत विजग्राहकांची विजकनेक्शन तोडणी विरोधात भाजपा 24 फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्गसह राज्यात जेलभरो आंदोलन छेडणार असल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. खासदार नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात जेलभरो आंदोलन छेडले जाणार आहे. पालकमंत्र्यानी विजकनेक्शन न तोडण्याचेआदेश देऊनही पालकमंत्र्यांना न जुमानता जिल्ह्यात विजअधिकारी विजकनेक्शन तोडत आहेत. विजमंत्री राऊत यांनी 100 युनिट पर्यंत विजमाफीची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र आघाडी सरकारच्या मंत्र्यांचे एकमत न झाल्यामुळे ही विजमाफी दिली नाही. लॉकडाऊन काळात भरमसाठ विजबिले आकारण्यात आली.थकीत विजबिलांमध्ये अवाजवी आकारलेला दंड रद्द करावा, 100 युनिटपर्यंत विजबिले माफ करावीत, 300 युनिटपर्यंत च्या बिलांना मध्यप्रदेश, गुजरात च्या धर्तीवर सवलत द्यावी, विद्युतशुल्कातून मिळणाऱ्या 9 हजार 500 कोटी रुपये निधीचा वापर विजबिलमाफीसाठी करावा, एकीकडे कृषी संजीवनी योजना सुरू करता तर दुसरीकडे विजकनेक्शन तोडण्याचा तुघलकी कारभार बंद करा आदी मागण्यांसाठी जेलभरो आंदोलन छेडणार असल्याचे तेली म्हणाले

You cannot copy content of this page