अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात राजकीय कोरोना तर आला नाही ना…?

भाजपा आमदार नितेश राणे यांचा खोचक सवाल

*💫कणकवली दि.२२-:* राज्याच्या अर्थसंकल्प अधिवेशनाच्या तोंडावर आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री कोव्हीड पॉझिटिव्ह सापडू लागलेत. सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरणाऱ्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमिवर महाराष्ट्रात राजकीय कोरोना तर आला नाही ना, असा खोचक सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. मागील दीड वर्ष राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरणारे आरोग्यमंत्री टोपे कोव्हीड पॉझिटिव्ह आले आहेत. निवडणूक प्रचारात आघाडीवर असलेले राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री जयंत पाटील कोव्हीड पॉझिटिव्ह आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ आज कोव्हीड पॉझिटिव्ह आढळले आहेत. राष्ट्रवादीचे एकनाथ खडसेनाही कोरोनाची लागण झाली आहे. ऐन अर्थसंकल्पाच्या तोंडावरच हे मंत्री कोव्हीड पॉझिटिव्ह आल्यामुळे राज्यात राजकीय कोरोना तर झाला नाहीय ना ? असा मार्मिक सवाल आमदार नितेश यांनी केला. जसा लंडनमध्ये नवीन कोरोना आढळला आहे तसा महाराष्ट्रातही नवीन राजकीय कोरोना सुरू झालाय का याची तपासणी करण्याची मागणी डब्ल्यू. एच.ओ.कडे करणार असल्याची टीकाही आमदार नितेश यांनी केली.

You cannot copy content of this page