आदिवासी कातकरी मारहाण प्रकरण ; वनपाल सह सर्व आरोपीना 1 दिवस पोलीस कोठडी….

*💫कणकवली दि.२२-:* फोंडाघाट येथील आदिवासी कातकरीना मारहाण करणे वनपाल आणि वनरक्षकांना चांगलेच भोवले असून वनपाल शशिकांत साटम यांच्यासह अन्य 4 वनरक्षकांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासी अधिकारी डीवायएसपी डॉ रोहिणी सोळंके यांनी या गुन्ह्यातील वनपाल शशिकांत साटम, वनरक्षक संदिपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छीन्द्र श्रीकृष्ण दराडे, सत्यवान सहदेव कुबल या आरोपीना आज जिल्हा न्यायालयासमोर हजर केले. जिल्हा न्यायालयाने सर्व आरोपीना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

You cannot copy content of this page