सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीत खळबळ

सायंकाळी बोलाविली तातडीची बैठक:निर्णय मागे घेण्यासाठी शरद पवार यांना एकत्रित करणार विनंती: अमित सामंत

*कुडाळ ता.०२-: राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी आत्ताच राजकीय निवृत्ती घोषणा केलेली आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून आम्हाला ही गोष्ट मान्यच होऊ शकत नाही. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा आणि पूर्वीप्रमाणेच आम्हाला मार्गदर्शन करावे. याकरिता जिल्ह्याच्या एकत्रित आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचवावा यासाठी आज सायंकाळी पाच वाजता कुडाळ येथील जिल्हा कार्यालयात तातडीची महत्त्वाची बैठक आयोजित केली आहे.

यासाठी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page