दोडामार्ग मध्ये अवकाळी पावसाचा तडाखा….

शेतकरी चिंतेत

*💫दोडामार्ग दि.२२ सुमित दळवी-:* आज दोडामार्ग शहर व परिसराला अवकाळी पावसाने झोडपून काढले. अवेळी पडलेल्या पावसाचा काजू पिकांवर मोठा परिणाम होणार असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची एकच तारांबळ उडाली. पाऊस पडल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. अवकाळी झालेल्या पावसाचा परिणाम काजू पिकावर होणार आहे. ऐन काजू हंगामाच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहेत.

You cannot copy content of this page