*💫सावंतवाडी दि.२२-:* सावंतवाडी शहर व तालुक्यात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वादळी वारा व गडगडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस कोसळला. गेले काही दिवस जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. काल सायंकाळी सावंतवाडी परिसरात मुसळधार पाऊस कोसळला होता. तसेच काल रात्रीही तुरळक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळल्या होत्या. तसेच आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यातच दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अजूनही पाऊस सुरूच आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या काजू आंबा पिकाचे नुकसान तर होणारच आहे. त्याचबरोबर मिर्ची, चवळी व इतर भाजी पिकाचे तसेच गवत, लाकूड यांचे नुकसान होणार आहे.
सावंतवाडी तालुक्यात गडगडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस…
