कणकवलीत उद्यापासून भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन

चारुदत्त आफळे बुवा यांचे शिवचरित्रावर कीर्तन

⚡कणकवली ता.२७-: संस्कृती संवर्धन मंच कणकवली आयोजित कणकवली मध्ये २८, २९, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केलेले आहे.

राष्ट्रीय कीर्तनकार ह .भ .प. चारुदत्त आफळे बुवा यांचे किर्तन कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर सायंकाळी ६.३० ते ९.३० या कालावधीत होणार आहे यामध्ये २८ तारीख छत्रपतींचा जन्म आणि बालपण
२९ तारीख राजकीय कारकीर्द
३० तारीख राज्याभिषेक सोहळा
असे तीन दिवस किर्तनाचे विषय असणार आहेत .तीन दिवस चालणारा हा कीर्तनहोत्सव सर्वांसाठी मोफत आहे. तरी शिवप्रेमींनी आणि कीर्तन प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सस्कृति संवर्धन मंच कणकवलीचे अध्यक्ष दीपक बेलवलकर आणि प्रा.हरीभाऊ भिसे यांनी केले आहे

You cannot copy content of this page