रस्त्यावर उतरण्याचा ग्राहकांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.२६-: वीज बिलासह ग्राहकांना देण्यात आलेले डिपॉझिट रक्कम अतिरिक्त सुरक्षा ठेव देयकाची ग्राहकांना सक्ती करू नये. त्याला नागरिकांकडून कडाडून विरोध आहे. याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास ग्राहकांसह रस्त्यांवर उतरू असा इशारा माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्याकडून देण्यात आला आहे.
तसेच यावेळी वीजबिलात लावण्यात आलेले विविध कर देखील रद्द करण्यात यावेत व ग्राहकांकडून निव्वळ बिल आकारावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा भोगटे यांनी दिला आहे.
