शारदा इंटरनॅशनल स्कूलच्यावतीने मोफत समर कॅम्प
२ ते ३० मे कालावधी

बांदा/प्रतिनिधी
पानवळ बांदा येथील शारदा इंटरनॅशनल ज्युनिअर कॉलेजच्या वतीने २ मे ३० मे या कालावधीत मोफत समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात ८ ते २० वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
या शिबिरात सकाळी ८ ते ९.३० वाजता मार्शल आर्ट, १०.३० ते दुपारी १२ या कालावधीत रोबोटिक्स आणि कोडींग शिकविण्यात येणार आहे. आठवड्यात दर मंगळवार, गुरुवार व शनिवारी वर्ग घेण्यात येणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर नावनोंदणीसाठी (मो. ८८०६५१७७९८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page