राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांच्याहस्ते झाला शुभारंभ
⚡सावंतवाडी ता.२६-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना सावंतवाडी शहर शाखेच्या कायमस्वरूपी फलकाचे अनावरण मनसेचे राज्य सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग पक्ष निरीक्षक संदीप दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची करण्यात आली. येथील जिमखाना येथे या फलकाचे माजी शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व माजी उपजिल्हाध्यक्ष अनिल केसरकर यांच्या हस्ते नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी धीरज परब संतोष भैरवकर अतुल केसरकर गुरुदास गवंडे ओमकार कुरतडकर प्रवीण गवस मंदार परब प्रमोद तावडे विलास सातार्डेकर दिलीप पवार आदी उपस्थित होते.
