कट्टा आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनने आ. वैभव नाईक यांचा सत्कार

⚡मालवण ता.२३-: गेले दोन टर्म आमदार म्हणून मालवण कुडाळ मतदारसंघात उत्तम कामगिरी केल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचा आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशन, कट्टा यांच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी आदर्श रिक्षा चालक-मालक असोसिएशनचे अध्यक्ष शिवा भोजने, गिरी चव्हाण, संदीप पोफळे, वंदेश ढोलम, गणेश वाईरकर, सुनील शिरोडकर, राजू भोगटे यांच्यासह शिवसेनेचे बाळ महाभोज, बाबू टेंबुलकर, दर्शन म्हाडगुत, कुणाल फाटक, दीपक भोगटे, संतोष गावडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल श्री. माने आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page