आचरा, चिंदर, त्रिंबक येथील रस्ता कामांची आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजने

⚡मालवण ता.२३-:
मालवण तालुक्यातील आचरा, चिंदर, त्रिंबक येथील विविध रस्ता कामांची भूमीपूजने आम. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत पार पडली. ग्रामस्थांची मागणी असलेले हे रस्ते मंजूर करून कामे सुरु केल्याबद्दल ग्रामस्थांनी आम. नाईक यांचे आभार मानले. यावेळी आ. वैभव नाईक यांनी आपण सत्तेत नसलो तरी गावातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.

यावेळी आचरा गाऊडवाडी मुख्य रस्ता ते पांगेवाडी कडून स्मशानभूमी मार्गे टेंबली पर्यंत देवगड मालवण रस्त्यास जोडणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (निधी ५ लाख), चिंदर भगवंतगड मुख्य रस्ता ते कातवणकर घाटी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (निधी ६ लाख) या कामांची भूमिपूजने तर आचरा कणकवली मुख्य रस्ता ते त्रिंबक बांबरवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे (निधी ५ लाख) या कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी त्रिंबक येथे विभागप्रमुख समीर लब्दे, भाऊ परब, पपू परुळेकर, श्रीकांत बागवे, हरी साटम, स्वप्ना तेली, शेखर घाडी, रोहिदास घाडीगावकर, अविराज परब, सागर चव्हाण, रमेश बाणे, दाजी भाटकर, शेखर घाडीगावकर, सुशांत परब, राकेश गावडे, राजू मेस्त्री, राजू त्रिंबककर, विश्राम मेस्त्री, भूषण गावडे, आचरा येथे चंदन पांगे, अनुष्का गावकर, तानाजी पांगे, मोहन पांगे, भाऊ पांगे, कमलाकर पांगे, प्रशांत गावकर, सुरेश गावकर, आबा गावकर, स्वप्नाली तळवडकर, सेजल आचरेकर, रुपेश आमडोस्कर, चिंदर येथे विनोद लब्दे, बाळा लब्दे,अमोल मांजरेकर, चारुदत्त लब्दे,प्रवीण लब्दे, पौर्णिमा लब्दे, सरिता लब्दे, पपू माळकर, स्वप्नील मुणगेकर, लीलाधर मुणगेकर, दीपाली लब्दे,दीप्ती लब्दे आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page