स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना कलात्मक व वैचारिक दृष्ट्या व्यक्त होण्यास वाव…

वामन खोत;गाबीत महोत्सव चित्रकला व निबंध स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

⚡मालवण ता.२२-: गाबीत समाजातील कार्यकर्ते आपल्या समाजासाठी चांगले कार्य करत आहेत. समाजातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांना कलात्मक व वैचारिक दृष्ट्या व्यक्त होण्यास वाव दिला आहे, असे प्रतिपादन भंडारी ए. सो. हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत यांनी केले.

मालवण दांडी किनाऱ्यावर होणाऱ्या गाबीत महोत्सवानिमित्त मालवण येथील भंडारी हायस्कुल येथे चित्रकला व निबंध स्पर्धा पार पडली. या दोन्ही स्पर्धामध्ये गाबीत समाजातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेचे उदघाटन भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षक गंगाराम आडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

या दोन्ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा तीन गटात घेण्यात आल्या. दोन्ही स्पर्धासाठी गाबीत समाज जीवनाशी निगडित विषय देण्यात आले होते. शिक्षक पांडुरंग कोचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही स्पर्धा संपन्न झाल्या. त्यांना गाबीत समाज जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, भूषण मेतर, शिक्षक नारायण पराडकर, रुपेश खोबरेकर, रुपेश प्रभू, जगन्नाथ जोशी यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेतील प्रथम पाच क्रमांकाच्या विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी होणार असून बक्षीस वितरण गाबीत महोत्सवात करण्यात येणार आहे. यावेळी गाबीत समाजाचे बाबा मोंडकर, सौ. सेजल परब, सौ. सुरवी लोणे, सौ. माधुरी प्रभू, सौ. दिक्षा ढोके, रश्मीन रोगे, लक्ष्मीकांत खोबरेकर, गंगाराम आडकर, संमेश परब, नरेश हुले, बाबी जोगी, हेमंत मोंडकर, गणेश कुबल आदी तसेच इतर समाज बांधव, पालक उपस्थित होते.

You cannot copy content of this page