देशाला महासत्ताक बनविण्याची ताकद भाजप मध्येच !

भाजपचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत रुजवा ;केंद्रीय मंत्री ना नारायण राणे यांचे आवाहन

मालवण ता.२२-
काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे पक्ष देश सुरक्षित ठेऊ शकत नाहीत. तर देश सुरक्षित, महासत्ताक आणि देशातील प्रत्येक नागरिकाला आत्मनिर्भर बनविण्याची शक्ती आणि ताकद फक्त भारतीय जनता पक्षात आहे त्यामुळे भाजप या पक्षाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवून भाजप बलवान बनवितानाच जनतेचे कल्याण आणि समृद्धी देण्याची ताकद भाजपमध्येच आहे हे पटवून देऊन या भागातील जनतेला भाजपचे क्रियाशील कार्यकर्ते बनवा असे प्रतिपादन आवाहन केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी येथे बोलताना केले.

मालवण कुंभारमाठ येथील अथर्व हॉल मध्ये भाजपचा बूथ कार्यकर्ता मेळावा आज सायंकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी ना. राणे हे बोलत होते. यावेळी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य दत्ता सामंत, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, तालुकाध्यक्ष पुजा करलकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, शहर प्रभारी विजय केनवडेकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, महिला पदाधिकारी सरोज परब, राजू परुळेकर, दीपक पाटकर यासह अन्य प्रमुख पदाधिकारी बुथ अध्यक्ष, पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रारंभी धोंडी चिंदरकर यांनी मालवण तालुका भाजपाचा संघटनात्मक आढावा घेतला. तर दस्तूरखुद्द नारायण राणे यांनी पक्ष संघटनेविषयी बूथ कार्यकर्ता आणि शक्ती केंद्र प्रमुख यांना प्रश्न विचारून बूथ निहाय संघटनात्मक पक्ष बांधणीची माहिती घेतली. यावेळी ना. राणे यांनी अनेकांची फिरकी घेताना आपल्या परीने संघटनेच्या कामाविषयी डोसही दिले.

यावेळी बोलताना ना. नारायण राणे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. आम्ही कामे करतोय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जनकल्याण च्या अनेक योजना राबविल्या जातं आहेत. एमएसएमई मार्फत जिल्ह्यातील तरुण तरुणीना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दोडामार्ग येथील खासगी जागेत दोनशे ते तीनशे उद्योग असणारे इंडस्ट्री पार्क उभे राहणार आहे. इथल्या तरुण तरुणीना त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. माझ्या जिल्ह्यातील बेकारी दूर करण्यासाठी, इथला माणूस आर्थिक सबल होण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर यायच्या पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत भारत दहाव्या क्रमांकावर होता. गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारच्या काळानंतर आता भारत पाचव्या क्रमांकावर आला आहे. २०३० साला पर्यंत भारताला महासत्ता बनविताना अमेरिका, जपानच्या बरोबरीने बसविण्याचे ध्येय पंतप्रधान मोदींनी घेतले आहे, असे सांगून ते म्हणाले जी २० देश प्रमुखपद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले. जागतिक कीर्तीचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने आपल्या देशाला लाभले. हा आपला अभिमान आहे. त्यांचे हात अधिक बळकट करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे, २०२४ ला ४०० प्लस लोकसभा विजयाचे लक्ष आहे. आणि ते मिळणारच. असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, उद्धवची सेना बुडाली आहे, काँग्रेसला अध्यक्ष नाही, राष्ट्रवादी म्हणजे एक ना धड भराभर चिंध्या अशा परिस्थितीत या भागात भाजप अधिक बलवान करतानाच भाजपचा प्रत्येक उमेदवार निवडून येणे हे आपले कर्तव्य नव्हे तर धर्म असला पाहिजे. आणि तो धर्म कोणी मोडता कामा नये असेही ना. राणे म्हणाले.

यावेळी माजी खासदार निलेश राणे म्हणाले आपली स्पर्धा वैभव नाईक किंवा कुठलाही पक्षाशी नाहीच. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजय हाच निर्धार आहे. १०० टक्के यश कोणीच रोखू शकत नाही. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजयाचा निर्धार करा. तीनही आमदार आणि खासदार आपलाच असला पाहिजे. असे सांगून निलेश राणे यांनी मालवण तालुक्यात ज्या वेगाने काम चालू आहे त्याच वेगाने ठेवूया. २०१४ च्या निवडणुकीत ज्यांनी राणे साहेबाना पाडलं त्याला पाडल्या शिवाय गप्प बसणार नाही. असे निलेश राणे शेवटी म्हणाले

यावेळी राजन तेली, अतुल काळसेकर, दत्ता सामंत यांची समयोचित भाषणे झाली.

You cannot copy content of this page