डेगवे येथे टाकीत पडलेल्या गव्याची वनविभागाकडून यशस्व सुटका…

⚡सावंतवाडी ता.२०-: मौजे डेगवे येथील राहणारा दिनेश सडवेलकर यांच्या घराच्या मागे बागायतीला लागून असलेल्या शौचालय टाकीत पडलेल्या गव्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका करण्यात आली आहे. ही घटना आज सकाळी घडली होती.

अधिक माहिती अशी की आज सकाळी नऊच्या सुमारास सडवेलकर यांच्या घरामागे शौचालय टाकीत गव्या रेडा कोसळला होता. त्यानंतर सडवेलकर यांना समजतात त्यानी तात्काळ वन विभागाला पाचारण करत घटनास्थळी वनविभाग दाखल होत सदर गव्याला बाहेर काढून त्याची यशस्वी सुटका केली.

You cannot copy content of this page