देवगडच्या युवकाला ऑनलाइन सव्वा लाखाला गंडवले


देवगड
अनोळखी व्यक्तीने स्कुटी विक्री करण्याच्या बहाण्याने रक्कम १,२०,०४०/- रुपये (अक्षरी-एक लाख वीस हजार चाळीस रुपये) एवढ्या रकमेची मोबाईल मधील गुगल पे व फोन पे या ऍप्स द्वारे पाठविण्यास सांगून फसवणूक केली अशी फिर्याद सुमित गणपत जुवाटकर (३३) रा देवगड यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.
.ही घटना १० फेब्रु २०२३ रोजी रात्री १० ते दिनांक ११फेब्रु २०२३ रोजी दु.२.३० वाजताचे मुदतीत ता.देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथे (मोबाईल वरून ऑनलाईन)घडली .
या फसवणुकीत रु २०००/-हजार कुरिअर,रु १८ हजार मूळ गाडीची किंमत,१५,१२०/- इन्शुरन्स ,१२०/-इन्शुरन्स वेगळे चार्जेस ,३० २४०/-इन्शुरन्स करीत ट्रांझेक्शन जास्त झाल्याने,२०हजार राउंड फिगर होण्या करिता गुगल पे द्वारे ,१९५०६/-राउंड फिगर होण्याकरिता गुगल पे द्वारे असे एकूण १.२०,०४०/-,एवढ्या रकमेची फसवणूक केली आहे.असे फिर्यादीत नमूद केले आहे. या घटनेसंदर्भात अनोळखी व्यक्तीविरुद्ध
.भा द. वि. कलम ४१९,४२०, माहिती तंत्रज्ञान (सुधारणा)अधिनियम २००८ चे कलम ६६(c), ६६(d)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास देवगड पोलीस करीत आहेत.

You cannot copy content of this page