कुडाळ एम.आय.डी.सी. येथे बाकड्यांचे लोकार्पण….

युवा फोरम भारत संघटनेच्या संकल्पनेतून व नगरसेवक सचिन काळप व उषा आठल्ये यांचा स्तुत्य उपक्रम

*💫कुडाळ दि.२०-:* येथील युवा फोरम भारत संघटना मुख्य कार्यालय येथे ,युवा फोरम भारत संघटनेमार्फत कुडाळ शहरातील श्रीरामवाडी, कुडाळ एम.आय.डी.सी. (टाकीवर) येथे, शतपावली करण्यासाठी वृद्ध माणसं येतात. त्यांना बसायला मिळावे म्हणून युवा फोरम भारत संघटनेच्या संकल्पनेतून व नगरसेवक सचिन काळप व उषा आठल्ये मॅडम ह्यांच्या सौजन्याने बाकड्यांचे लोकार्पण करण्यात आले. तसेच तिथे धूम्रपान व मद्यपान यांचा निषेध करण्यासाठी सार्वजनिक फलक लावण्यात आले. यावेळी नगसेवक सचिन काळप व उषा आठल्ये मॅडम उपस्थित होते. तसेच युवा फोरम भारत संघटना संस्थापक व अध्यक्ष यशवर्धन राणे, उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव हितेश कुडाळकर, सहसचिव अश्विनी जोशी, सिद्धी सावंत, ऋतुजा गोसावी, दिव्या सावंत, ओंकार परब, विठ्ठल तवटे, सूरज खरात, रोहन दंतास, सुयश घाटकर, अभिषेक पावसकर आदी स्वयंसेवक उपस्थित होते.

You cannot copy content of this page