रयतेच्या राजाला रयतेने दान केलेल्या दुधाने दुग्धाभिषेक…..

शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने कांदळगावात शिवजयंती साजरी.

*💫मालवण दि.२०-:* शिवजयंतीचे औचित्य साधत शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने ऐतिहासिक शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी रयतेने दान केलेल्या दुधातून कांदळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. सुरवातीस सकाळी किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरात छत्रपतींना अभिवादन करुन दूधाचा कलश घेऊन प्रतिष्ठानची मिरवणूक कांदळगावच्या दिशेने निघाली. यावेळी परेश मालवणकर यांनी दिलेल्या गारदीने किल्ले सिंधुदुर्ग परिसर दणाणून गेला. स्वराज्य ढोल पथकाच्या तालावर बंदर जेटी, मालवण – फोवकांडा पिंपळ- माघी गणेश मंदिर- धुरीवाडा- कोळंब- ओझर- कांदळगाव अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, बाल शिवाजी, जिजाबाई, सईबाई व इतर व्यक्ती रेखा बालचमुनीं साकारल्या होत्या. सतीश पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्ती रेखा साकारली होती. कांदळगावच्या बालविकास मंडळाने बाल शिवाजी व इतर व्यक्तीरेखा साकारल्या होत्या. मिरवणुकीमध्ये शिवप्रेमींनी कलशात दूध दान केले. यात शिवप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला. कांदळगाव येथे मिरवणूक दाखल होताच रणजीत परब व मित्रमंडळाने स्वागत केले. यशोधरा महिला मंडळाने फुलांचा वर्षाव करून कलशाचे स्वागत केले. सरपंच उमदी परब, माजी ग्रामपंचायत सदस्य विकास आचरेकर, शिवगर्जना प्रतिष्ठानचे सचिव सोनम कदम, शिवगर्जना प्रतिष्ठानचे उत्सव प्रमुख अक्षय रजपूत यांच्या हस्ते रामेश्वर मंदिर समोरील छत्रपतींच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला. यात जमलेल्या दुधामधील फक्त एक लीटर दुधाचाच अभिषेकासाठी वापर करण्यात आला. उर्वरित दुधाचे शिवप्रेमींना पिण्यासाठी वाटप करण्यात आले. श्री देव रामेश्वर देवस्थान व नवयुवक मंडळ कांदळगाव यांच्यावतीने अल्पोपहाराची सुविधा करण्यात आली होती. आशू आचरेकर, यशवंत कांदळकर, महेश परुळेकर, रोहन राणे, युवराज कदम, स्मितिल कदम आणि सर्व मित्र मंडळींच्या सहकार्याने शिवगर्जना प्रतिष्ठानने या सोहळ्याचे आयोजन केले होते. यावेळी शिवगर्जना प्रतिष्ठानचे उत्सव प्रतिनिधी वैभव वळंजू, दिपेश पवार, मुरारी गावडे, भुषण गावडे, ललित चव्हाण, तुषार हडकर, वैभव कदम, राणी तायशेटे, पुनम चव्हाण, भारती आडकर, यशश्री वरक, राहूल जाधव, दिनेश पवार गणेश पवार, पंकज गोलतकर दुर्गेश गावकर, यशोधरा महिला मंडळ कांदळगाव, नवयुवक मंडळ कांदळगाव, रणजीत परब व मित्र मंडळ, प्रसाद भोगले व मित्रमंडळ, प्रमोद कदम, राजेंद्र कदम, उदय कदम, ग्रामपंचायत सदस्य माधवी कदम, लॉर्ड सीमा चषक संयोजन समितीचे सर्व सभासद, बाबू होते, गौरव कोदे, विहार कोदे, सिद्धार्थ विकास मंडळ आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काही अज्ञात वास्तू लोकांना ज्ञात व्हाव्यात हा शिवगर्जना प्रतिष्ठानचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः लावलेल्या वडाच्या झाडाची माहिती सर्वाना मिळावी या हेतूने यावेळी फलकाचे अनावरण करण्यात आले.

You cannot copy content of this page