*दुचाकी चालक दोन युवक गंभीर जख्मी; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
आंबोली -:आंबोली येथील एच पी पेट्रोल पंप समोर एका चारचाकी आणि दुचाकी मध्ये अपघात झाला असून, या अपघातात दुचाकी वरील दोन्ही युवक जख्मी झाले आहेत. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला जाताना हा अपघात झाला असून, या अपघाताची माहिती मिळताच पोलिस देसाई हे घटनास्थळी दाखल झाले असून, त्यानी पंचनामा केला आहे. अपघातात जख्मी दोन्ही युवकांना अधिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
