साटेलीत गोवा बनावटीच्या दारूवर कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई….

_१८ लाखांचा मुद्देमाल जप्त

*💫बांदा दि.२०-:* राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर येथील भरारी पथकाने साटेली गावात एका चार चाकी स्विफ्ट गाडीचा ( एमएच ०६ एडब्ल्यू ७०७०) पाठलाग करून ९ लाख १६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणातील आरोपी संतोष पांडूरंग देऊलकर (३०, रा. नाईकवाडी बिंबवणे कुडाळ) याला सावंतवाडी न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाने आज सावंतवाडी तालुक्यात दोन कारवाया करून एकूण सुमारे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. दुसऱ्या कारवाईतील गौरव चंद्रकांत वेंगुर्लेकर हा संशयित आरोपी फरार झाला आहे. त्याच्याकडील (एमएच ०७ क्यू ४९५९) या स्विफ्ट गाडीत ७ लाख १८ हजार ८०० रुपयांचा दारुसाठा आढळून आला. ही कारवाई कार्यालय निरीक्षक एस. एस. साळवे, दुय्यम निरीक्षक के. डी. कोळी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुहास वरुदे, जवान सुखदेव सीद, प्रदीप गुरव, वाहन चालक यांच्या पथकाने केली.

You cannot copy content of this page