⚡मालवण ता.१३-: मला मिळालेला आजचा हा राष्ट्रीय पुरस्कार माझा एकट्याचा नसून आजवर मला नेहमी साथ देणाऱ्या माझ्या संपूर्ण परिवाराचा, माझ्या सर्व आजवरच्या गुरुजनांचा आणि मसुरे गावाचा आहे. या तीनही संस्थांचे कार्य महान असून देशाच्या कानाकोपऱ्यातून गुणवंतांना अनोख्या पद्धतीने न्याय देण्याचे कार्य गौरव करणाऱ्या संस्थांनी केले आहे माझा आजचा हा पुरस्कार माझ्यासारख्या मुलीला इंजिनिअरिंगचे शिक्षण देणाऱ्या कणकवलीच्या एस एस पी एम कॉलेजला मी समर्पित करत आहे असे प्रतिपादन डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे पुरस्कार वितरण प्रसंगी बोलताना वैभवी पेडणेकर यांनी केले.
सनी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, श्वेतगंध सोशल फाउंडेशन डोंबिवली, समृद्धी पब्लिकेशन महाराष्ट्र आयोजित राष्ट्रीय कर्तुत्व ज्योतिरमय सदभावना राज्यस्तरीय संमेलन ठाणे डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे पार पडले. या संमेलन मध्ये वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला महाराष्ट्र गुणवंत युवती प्रेरणा सन्मान २०२३ देऊन गौरवण्यात आले . यावेळी सुप्रसिद्ध सिने अभिनेते माननीय विजय पाटकर, अभिनेत्री माननीय उर्मिला डांगे, डॉक्टर सनी शंकर वालीका अध्यक्ष सनी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, ऍडव्होकेट सदाशिव काळे (मुंबई हायकोर्ट) अध्यक्ष निवड समिती सदाशिव काळे (मुंबई हायकोर्ट) अध्यक्ष निवड समिती, स्वागत अध्यक्ष प्रा. बी एन खरात,
खासदार राजन विचारे, श्री केदार दिघे, नेहा परब, श्वेता शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रसिद्ध अभिनेते विजय पाटकर म्हणाले सनी चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबई, श्वेतगंधा सोशल फाउंडेशन डोंबिवली आणि समृद्धी पब्लिकेशन महाराष्ट्र या नामवंत अशा ट्रस्टचे कार्य अतिशय महान असून या कार्याला मी सलाम करतो. आज देशाच्या कानाकोपऱ्यातून अगदी निवडक हिरे त्यांनी समाजापुढे आणून त्यांच्या कार्याचा केलेला गौरव कौतुकास्पद आहे.
यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर, आभार डॉक्टर बी एन खरात यांनी मानले.
