केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन…
⚡सावंतवाडी ता.०९-: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ७१ वा. वाढदिवसाचे औचित्य साधून सातार्डा माई सभागृह येथे भाजप तर्फे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते पार पडले
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद माजी सदस्य शेरवानी गावकर शेखर गावकर बाळू परब सुरेश गावडे आधी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
