उद्योजक भावेश भाटीया; श्री उचगावर हे खऱ्या अर्थाने अधं बांधवांसाठी भारतरत्न…
⚡सावंतवाडी ता.०९-: येथील “नॅब नेत्र रुग्णालय” हे अंध बांधवांचे माहेरघर आहे भविष्यात या रुग्णालयाच्या माध्यमातून अंध बांधवांची सेवा करताना रुग्णालयाची ओळख सर्वदूर व्हावी असे काम करा त्याचबरोबर रुग्णालय उभारणीत अनंत उचगावकर यांची मेहनत आपण जवळून पाहीली आहे त्यामुळे ते अंध बांधवासाठी भारतरत्न आहेत आणि भविष्यातही राहणार असे गौरवोद्गार महाबळेश्वर येथील उद्योजक भावेश भाटीया यांनी काढले.
नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाइंड सावंतवाडी व नॅब नेत्र रुग्णालय सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी भटवाडी येथे उभारण्यात आलेल्या नॅब नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन उद्योजक श्री भाटिया यांच्या हस्ते पार पडले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते व्यासपीठावरून होते. सुरवातीला
नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन उद्योजक श्री भाटिया तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला यानंतर आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
श्री भाटीया म्हणाले, प्रत्येकाने जीवनात विजन ठेवून काम केल्यास कोणीही मागे राहत नाही तो आपल्या यशाचा टप्पा नक्कीच गाठू शकतो याचप्रमाणे श्री उजगावकर यांनी सावंतवाडी नेते रुग्णालयासाठी व्हिजन ठेवून काम केले त्यांची मेहनत आपण जवळून पाहिली आहे हॉस्पिटल साठी दिवस-रात्र काम करताना पाच दहा हजाराच्या मदतीसाठी ही त्यांनी स्वतःला झोकून दिले. काही समाजकंटकांनी याला विरोध केला मात्र विरोधाला विरोध न करता ते पुढे चालत राहिले. त्यामुळे राज्यातील दानशूर व्यक्तीने या रुग्णालयासाठी आर्थिक स्वरूपात पुढे येणे गरजेचे आहे बर्थडे पार्टी अशा गोष्टीवर पैसे उधळण्यापेक्षा या रुग्णालयासाठी मदत करून आपल्या मुलांचा बर्थडे सेलिब्रेशन करा असे आवाहन त्यांनी केले.
